निरीक्षण, अनुकरण तसेच अनुभवातून विद्यार्थी शिकतात : शिवाजी काकडे

Foto
ज्ञानविकास विद्यालयात पालक - शिक्षक सहविचार सभा

सिल्लोड, (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवर होणारे बदल लक्षात घेता आपल्याला स्वतःत बदल करावे लागेल. तुमच्या प्रत्येकात काही ना काही करण्याच्या क्षमता असतात फक्त त्या ओळखून त्यानुसार वाटचाल करावी असे प्रतिपादन शिवाजी काकडे यांनी केले.

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून दशसूत्रीतील संस्कार मूल्यांची रुजवणूक म्हणजेच आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आयोजित पालक शिक्षक सहविचार सभेत बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरूवात महामानवांच्या प्रतिमेचे काकडे यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. 

यावेळी पुढे बोलतानाकाकडे म्हणाले की, दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या आरोग्यसंबंधी सवयी बदलत आहे चटपटीत पदार्थांकडे आकर्षित होऊन पौष्टिक आणि सकस आहाराकडे दुर्लक्ष होताना पालकाने विशेष लक्ष द्यावे. आयुष्यात तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर वाईट सवयी
टाळाव्या. मोबाईलमध्ये गरजेप्रमाणे लक्ष देताना पालकांनी देखील आपल्या मुलांसोबत रोज मैत्रीपूर्ण चर्चा करावी. शारीरिक क्षमता विकसित करताना सकस आहार, अभ्यासाच्या वेळेचे नियोजन, सर्वांचा आदर या महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष द्यावे असेही सांगण्यात आले.

 आज आयोजित दशसूत्री चर्चेत गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे, स्पर्धात्मक, आरोग्यक्षम, तंत्रस्नेही, कौशल्यपूर्ण स्वावलंबित विद्यार्थी घडवणे, आनंददायी, नाविन्यपूर्ण व रचनात्मक शिक्षण मुलींची सुरक्षितता, महिला सन्मान, आत्मविश्वास जागृती, स्व अभिव्यक्ती प्रोत्साहन, स्वगुण चालना, नवशिक्षण पद्धती आदींवर विद्यार्थी पालक शिक्षक सहविचार चर्चा झाली. यावेळी पालक यांच्यासह ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षकवृंद, शालेय वाहनचालक मालक यांची उपस्थिती होती.